"ग्रामीण भागातील रणरागिनी" उपसरपंच सौ.अनुजाताई पटणे
(चाकुर ता.प्र./सलीमभाई तांबोळी)
स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर सुरू होतो एका चौकटीचा प्रवास. हळू बोल, हळू चाल ,हाळू हास,इकडे पाहू नकोस, तिकडे पाहू नकोस... तिला लग्नविधीपासून अंत्यसंस्कारापर्यंत आणि शुभ कार्यापासून सामुदायिक उत्सवापर्यंत महिलांना डावी वागणूक दिली जाते. अशा प्रकारचा अन्याय गुलामगिरीचं जीवन सहन करतच विषमतेचं जीवन जगावं लागत .
' चुल आणि मुल' यातच तिचे संपूर्ण आयुष्य नष्ट होते. अशा या जगण्याला कांही महिलांनी विरोध केला. त्यांना हे चित्र बदलले पाहीजे, असं वाटू लागले. त्यासाठी त्या शिकू लागल्या... पुरुषाबरोबर उतुंग भरारी घेऊन, सर्वच क्षेत्रात कार्य करू लागल्या. त्या राजकारण, समाजकारण, वैमानिक, सांस्कृतिक, अर्थकारण, अभिनय, संगीत, शिक्षण इ. क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवू लागल्या .
राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, फातिमा शेख, मुक्ता साळवे, माता भीमाई, माता रमाई, इंदिरा गांधी ,सोनिया गांधी, किरण बेदी, प्रतिभाताई पाटील, सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन, कल्पना चावला, लता मंगेशकर, या महान स्त्रियांचा आदर्श आपल्या डोळयासमोर ठेवून बहुंताश महिला स्वाभिमानाने समाजकारण, राजकारण, सर्वच क्षेत्रात ताठ मानेने आम्ही अबला नसून सबला आहोत, असे जीवन जगत आहेत.
या सर्व महिलांचा आदर्श आपल्या डोळयासमोर ठेवून, आदर्श गाव अलगरवाडी ता. चाकूर येथील उपसरपंच तथा बचत गटाच्या सी .आर.पी. म्हणून कार्यरत असलेल्या सौ. अनुजाताई संगमेश्वर पटणे यांचा जीवन प्रवास असाच संघर्षमय व आदर्श आहे.
" अनुजाताई म्हणजे कार्य कृर्तत्वाची खाण
अनुजाताई म्हणजे घर प्रपंचाची शान
अनुजाताई म्हणजे आशेचा उगवता किरण
अनुजाताई म्हणजे दिपमालेचे तेजस्वी तोरण "
अनुजाताईचे माहेर देवर्जन ता.उदगीर होय. त्यांचे शिक्षण १० वी पर्यंतच झालेले. आई लक्ष्मीबाई व वडील शिवाजीराव तोंडारे यांनी आपल्या मुलीला लहान पणापासून चांगले संस्कार दिले. पुढे ११वीत असताना अनुजाताईचा विवाह चाकूर तालुक्यातील अलगरवाडी या गावचे व्यापारी नागनाथ पटणे व सौ. प्रेमलाबाई पटणे यांचा मुलगा संगमेश्वर पटणे यांच्याशी झाला. त्यांचे पती संगमेश्वर पटणे यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी आपल्या पत्नीला सुध्दा सामाजिक कार्य करण्यास परवानगी दिली.
अनुजाताई या स्वतः हुशार असल्याने त्यांचा सहवास "उमेद" या सेवाभावी संस्थेशी आला. त्यांनी उमेदमध्ये बचत गटाचे प्रशिक्षण घेत असताना तिथे अनेक व्यासंगी लोकांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. आणि येथूनच त्यांच्या जीवनात नव उमेद आली. आणि त्यांनी माहिला बचत गटाच्या कार्यास प्रारंभ केला.
त्यांनी अलगरवाडी येथील महिलाना संघटीत करून, त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली.... सुरवातीला कांही महिलांनी त्यांना विरोध केला. नंतर बचतीचे महत्व पटवून देण्यास सुरुवात केली. हळुहळू महिला त्यांच्याकडे आकर्षित झाल्या. त्यांनी सुरुवातीला "महात्मा बसवेश्वर स्वंयसाहय्यता महिला बचत "गटाची स्थापना केली. या गटाच्या त्या स्वतः कोषाध्यक्ष आहेत. या गटातील महिलांना बचतीची सवय लागली. पुढे वेगवेगळी २२ बचत गट काढले. त्या या सर्व बचत गटाच्या सी.आर.पी. म्हणून उत्कृष्टपणे कार्य करतात. त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून अलगरवाडी येथे 'मिरची कांडप ',पापड उदयोग, खारूडया व कोरोनासाठी मास्क तयार करणे असे उद्योग सुरू केले.
अनुजाताई सध्या आदर्श गाव अलगरवाडीच्या उपसरपंच आहेत. गावात कोणताही कार्यक्रम असला की त्या सर्व महिलांना घेऊन कार्यक्रमाला येतात. त्यांना आदर्श सरपंच गोविंदराव माकणे ग्रामसेवक प्रशांत राजे, तालूका व्यवस्थापक माधव शेळके, बी.एम.एम. रिंकू कोंम्पले, व माणदेशी फाऊण्डेशन यांच्या मार्गदर्शनामुळेच मी हे सर्व करू शकले असे त्या आवर्जून सांगतात.
अलगरवाडी येथील महिला "चुल आणि मुल" यामध्येच रममान होत्या त्यांना यातून बाहेर काढण्याचे कार्य सौ. अनुजाताई पटणे या करत आहेत. आज गावात २२ महिला बचत गटाच्या माध्यमातून जवळ जवळ २२८ महिलाना संघटित, स्वाभिमानी, सबला आणि निर्भर बनविन्याचे कार्ये त्या करीत आहेत.
म्हणून त्यांच्या बददल एवढेच म्हणावेसे वाटते.
" जिजाऊ स्वाभिमानाने जगली शिवबासाठी... स्वराज्याची स्थापना करण्यासाठी... ,
लक्ष्मीबाई लढली झाशीसाठी.... ,स्वातंत्र्याचा झेंडा फडकाविण्यासाठी.... अलगरवाडीच्या अनुजाताई जगत आहेत....,
बचत गटाच्या आस्मितेसाठी...
लढत आहेत सर्व महिलांच्या उत्थानासाठी....
या स्पर्धेच्या युगात स्वतःचे व अलगरवाडी गावाचे अस्तित्व टिकविण्यासाठी.... ,
कोरोना सारख्या महामारीच्या आजारावर मात करण्यासाठी आपल्या बचत गटाच्या महिला सोबत घेऊन सरपंच गोविंदराव माकणे यांच्या मार्गदर्शनानुसार " "जिच्या हाती आरोग्याची दोरी, ती जगा उध्दारी "या नवीन सूत्रानुसार त्यांनी प्रत्येक घरोघर डेटॉल साबन, अन्नधान्य, कांदे टमाटे वाटप केले .
शासनाने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावोगावी युवकासाठी " अॅन्टी कोरोना फोर्स" स्थापन केली आहे. त्यात अलगरवाडी येथील बचत गटाच्या सी.आर .पी. उपसरपंच सौ. अनुजाताई पटणे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळ जवळ १० ते १५ महिलांनी दोन चेक पोस्टवर अथक परिश्रम घेऊन खडा पहारा देऊन आम्ही सुद्धा काही कमी नाही, हे दाखवून दिले. या कार्यात त्यांना सौ. कविता कोरे, सौ. दिपा माकणे, सौ. स्वाती पटणे, सौ. अनिता ढोबळे, सौ. अश्विनी होनाळे, सौ. शितल माकणे, सौ.पार्वती पाटील, सौ. शिवमाला माकणे, सौ. माधवी माकणे, सौ. पूजा डोंगरे, सौ. जयश्री लागलवाड या महिलानी मोलाची साथ दिली आहे.
त्यांना वाचण, नक्षीकाम, शिवणकला, व समाजकार्याची खूप आवड आहे. या त्यांच्या कार्यात त्यांचे पती व्यापारी/सामाजिक कार्येकर्ते संगमेश्वर पटणे यांची खंबीर साथ आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून अलगरवाडी येथील संपूर्ण होलार समाज बांधवाच्या वतीने सरपंच गोविंदराव माकणे व उपसरपंच सौ. अनुजाताई व सर्व सदस्याचा प्रा. वैजनाथ सुरनर व सौ. कुसुम सुरनर यांनी सत्कार केला. अलगरवाडी ता. चाकूर येथे मार्च २०२० मध्ये जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून " जागर स्त्री शक्तीचा सन्मान माऊलीचा" या सदराखाली चाकूर तालूक्यातील १०१ महिलांचा साडी चोळी सन्मान चिन्ह देऊन मान्यवर महिलाच्या हस्ते सन्मान करन्यात आला. या मध्ये सुध्दा अनुजाताईचे योगदान खूप महत्वाचे राहिले आहे.
अशा या गावासाठी गावातील महिलांसाठी जात, धर्म, पंथ, न मानता कार्ये करणाऱ्या व आपल्या कार्याला वाहुन घेणाऱ्या कार्यकर्त्या ताईना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा !
शब्दांकन: प्रा. वैजनाथ सुरनर



0 Comments