Latest News

6/recent/ticker-posts

औराद नदीपात्रातील अवैध वाळू उपसा थांबवा अन्यथा रास्तारोको करणार- मनसे

औराद नदीपात्रातील अवैध वाळू उपसा थांबवा अन्यथा रास्तारोको करणार- मनसे 


जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंग भीकाने यांची तहसिलदाराकडे मागणी

निलंगा:( तालुका प्रतिनिधि/इरफान शेख ) तालुक्यातील औराद शहाजानी येथील तेरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा बंद करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंग भिकाने यांच्या नेतृत्वाखाली निलंगा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ही अवैध वाळू उपसा जर बंद नाही झाली तर येणाऱ्या बुधवारी निलंगा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष सुरज पटेल, सचिव जाकीर शेख, उपाध्यक्ष नजीर मुजावर, कृष्णा सुरवसे, बाबळसुरे कैलास सह निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा निलंगा चे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments