Latest News

6/recent/ticker-posts

लातूर वुमेन्स प्रीमियर क्रिकेट लीग मध्ये निलंग्यातील महिलांचा सक्रिय सहभाग

लातूर वुमेन्स प्रीमियर क्रिकेट लीग मध्ये निलंग्यातील महिलांचा सक्रिय सहभाग


वसीम मुजावर

        जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राजर्षी शाहू महाविद्यालय डॉक्टर आम्रपाली अभयसिंग देशमुख यांच्या संयुक्त विद्यमानाने लातूर वुमेन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल लातूर येथे ठेवण्यात आले होते.ते आज पूर्ण झाल्या त्यात आयोजित स्पर्धेत खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये निलंगा येथील  शिक्षक व महिला खेळाडूंचा सक्रिय सहभाग नोंदवत जिल्हा परिषद शिक्षिका व ग्रामसेविका यांचा समावेश होता.

या स्पर्धेमध्ये चार संघाचा सहभाग होता अंतिम फेरीमध्ये शाहू सुपर वुमेन्स विजेतेपद मिळवले तर क्रेझी वुमन्स यांनी रनर ट्रॉफीचा मान पटकावला

अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. शेवटी सुपर ओव्हर खेळली गेली त्यात क्रेझी वुमन्स महिला संघाला अवघ्या एका धावाने निसटता पराभव स्वीकारा लागला त्यामुळे संघ उपविजेता ठरला आहे.


त्या उपविजेत्या संघामध्ये निलंगा येथील शिक्षक महिला व ग्रामसेवक महिला यांचा सहभाग होता कर्णधार श्रीमती राजश्री बनसोडे, गड्डी मे सारिका, थोरमोठे आशा, श्रीमती दवणे मंगल, श्रीमती बापुरे संगीता, परगे संगीता, श्रीमती आनंदा भाग्यश्री , राजश्री शिंदे सह ग्रामसेवक महिला यांचा समावेश होता

आपले दैनंदिन कार्यात वेगळं काही करायचं विसरून जात आहे. महिलांना घर आणि प्रपंच यापलीकडे काहीतरी वेगळे करण्याची समाज व परिसराचा दबाव असतो मात्र या पलीकडे जाऊन या महिलांनी महिला दिनाचे औचित्य साधून नेत्रदिपक कामगिरी करत हम किसीसे कम नही असे म्हणत स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून उपविजेता संघ मानकरी ठरल्याने यांचे पूर्ण निलंगा तालुक्यामध्ये अभिनंदन व कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments