भादा प्रशालेने दिला विद्यार्थ्यांला आर्थिक पाठबळ
भादा: महिला दिनाचा औचित्य साधून आई वडिलांची छाया नसलेला जि. प. प्रशाला भादा येथे वर्ग 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेला विशाल हजारे याला त्याच्या पुढील उच्च शिक्षणासाठी व आर्थिक संकटात सापडलेल्या या कुटुंबासाठी आर्थिक मदत प्राप्त करून देण्यासाठी जि. प. कन्या व प्रशाला भादा या दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांनी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासोबत चर्चा केली असता शिक्षकांनी मदतीचा हात पुढे केला. माकणे एम.डी., नागापुरे एस. यु., श्रीमती गुरव डी. व्ही., श्रीमती खडके ए. एम., श्रीमती शेंडे ए. बी., श्रीमती केंद्रे डी. एम., डॉ पाटील एन.व्ही., जगताप के.डी., तोटे एस. जी., श्रीमती मंठाळे एस. एस., श्रीमती झरकर बी. एस., श्रीमती नाईक एस. पी., श्री शिवपुजे डी. जी., श्रीमती बनसोडे जे. पी., श्रीमती पवार जे. एन., श्रीमती नळे ए. जी., बनकर एम. बी., व अनंतवार आर. बी. या सर्व शिक्षकांनी रुपये 9000 चा बँकेत एफ. डी. त्याच्या नावे करून एफ. डी. प्रमाणपत्र त्याच्या हाती सोपविला. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुनराव लटूरे, सदस्य गुणवंतराव उबाळे, महेशराव कांबळे (शिक्षक) श्रीमती मिरा हजारे आदी उपस्थित होते.

0 Comments