मदनसुरीत ज्येष्ठ नागरिकांना दिली covid-19 ची लस
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) सोमवार दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथे साठ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना covid-19 ची लस देण्यात आली .यावेळी प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेनेचे शिवाजी माने यांच्या हस्ते करून मदनसुरीतील ज्येष्ठ नागरिकांना covid-19 ची लस देण्याचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरंजे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप जाधव, अशोक सूर्यवंशी, व्यंकट राजे,आबा गायकवाड, माजी सरपंच अशोक जाधव, गुलाब माने,विलास अहिरे,राजकुमार जाधव, माधव शिंदे,बालाजी माने, अल्लीमोद्दीन शेख,मधुकर जाधव,आप्पाराव जाधव, शुभम माने,मुद्रिकाबाई जाधव, तसेच आशा वर्कर,आरोग्य सेविका, यांची प्रमुख उपस्थिती होती.ज्येष्ठ नागरिक म्हणून बाबुराव माने,मधुकर जाधव, मुद्रिकाबाई जाधव, मथुराबाई माने,जिजाबाई माने,लक्ष्मीबाई माने,अप्पाराव जाधव,लता माळी,इंदूबाई जाधव,सुमन जाधव,दिलीप पाटील,राजाबाई पाटील,कुमार माने,छायाबाई पाटील, कस्तुरबाई पांचाळ, वसंतराव पांचाळ, शांताबाई जाधव व गावातील इतर ज्येष्ठ नागरिकांना covid-19 ची लस देण्यात आली.

0 Comments