महिला दिन अंगणवाडी ताईकडून साजरा
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथील अंगणवाडी क्र 4 मध्ये सर्व सेविका, मदतनीस याच्याकडून साजरा करण्यात आला. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी दि 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत, स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री,असा समज सर्वसाधारणपणे काही कर्मठ वृत्तीच्या पुरुषांनी अशीच परंपरा रूढ केली होती म्हणूनच, समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या.त्यांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार देण्याचे काम भारतीय संविधानातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने केले आहे. यामुळेच आजची भारतीय स्त्री माना सन्मानाने जगात आज उजळ माथ्याने वावरत आहे.
अशा या सन्माननीय स्त्रियांमध्ये आद्य शिक्षिका सावित्रीमाई फुले, राजमाता जिजाऊ, माता रमाबाई आंबेडकरपुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर आदी तेजस्वी आणि सामाजिक कार्यात वाहून आपले जीवन समर्पित करणाऱ्या त्यागमूर्तीचे आज स्मरण करण्यात आले. यावेळी आहार, स्वच्छता याविषयी पर्यवेक्षिका पर्यवेक्षिका सुचिता कटके याच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले तर नंतर महिलांनी प्रा आ केंद्र भादा येथे जाऊन कोव्हिड लस घेतली. यावेळी अंगणवाडी सेविका-अर्चना उबाळे, कुसुम उबाळे, सरीता आगलावे, दैवाशाला कात्रे, सुषमा माळी, भागीर्थी पाटील, शिला कोळी, मदतनीस आशालता उबाळे, तस्लिमा खोजे, मंगल गोरे, महानंदा गायकवाड आदी उपस्थित होत्या.


0 Comments