लातूर शहरातील पानटपऱ्या आज दिवसभर बंद; मावा सुपारी खाण्याची उडाली तारांबळ
लातूर:{ जिल्हा प्रतिनिधी बी जी शेख } आज लातूर शहरातील पानटपऱ्या अन्नभेसळ अधिकाऱ्यांच्या कारवाईच्या धास्तीने बंद होत्या.लातूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पान टपरी आहेत शहरातील हनुमान चौकातील रिगल टाकीजवळील, औसा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आणि एमआयडीसी भागातील पानटपऱ्या अधिकार्याच्या भीतीपोटी बंद असल्याने मावा खाणाऱ्या तरुणाची चांगलीच तारांबळ उडाली होतानाचे चित्र दिसून आले. काही तरुण बंद पान टपरीच्या ठिकाणी जाऊन विचारपूस करून मावा भेटते का विचारू लागगे. परंतु आज दिवसभर भटकंती करून सुद्धा शहरात मावा सुपारी न मिळाल्याने सुपारी खाणाऱ्या तरुण नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.अन्न भेसळ व औषध प्रशासनाची कारवाई आता किती दिवस चालणार ? किती दिवस बंद करणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

0 Comments