Latest News

6/recent/ticker-posts

शांतीदूत फाउंडेशन निलंगा च्या वतिने विद्यार्थी खेळाडूंचा सत्कार-सन्मान कार्यक्रम

शांतीदूत फाउंडेशन निलंगा च्या वतिने विद्यार्थी  खेळाडूंचा सत्कार-सन्मान कार्यक्रम


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) शांतीदूत फाउंडेशन निलंगा च्या वतिने विद्यार्थी, खेळाडूंचा सत्कार-सन्मान कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेच्या पदाधिकारी सौ. रोहिणी राहुल चांदोरीकर होत्या. प्रमुख अतिथी श्रीमती. आशिया बडेखातल Imc एरिया मॕनेजर, सौ.मंजुषा गायकवाड  IMC chairman, सौ. सुनिताताई अरळीकर जि.काँग्रेस कमिटी अध्यक्षा, सौ. सुनिता ताई चोपणे माजी नगराध्यक्षा निलंगा, सौ. मिरा रायबन क्रिडा विभाग निलंगा, सय्यद मुजिब शिक्षक म.वि.निलंगा, सौ.मिनाक्षी शेटे , कांबळे मॕडम  व परीसरातील महिला पुरुष विद्यार्थी खेळाडू  उपस्थित होते. सर्व  प्रथम शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर पाहुण्यांचे ट्राॕफी पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आले. उपस्थित देशपातळीवर व राज्य स्तरावर पाञ खेळांडुचा सत्कार करण्यात आला. नवनाथ गायकवाड यांनी प्रस्तावना केली. मान्यवरांनी आजची स्त्री , शिक्षण ,आरोग्य ,संरक्षण ,सन्मान ,कौटुंबिक जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन धसवाडीकर जी.एम. यांनी केले तर आभार प्रदर्शन संदिप गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  राहुल चांदोरीकर, बब्रुवान गायकवाड जगदिश सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments