जिल्ह्याच्या विकासात क्रीडा क्षेत्राचाही मोठा हातभार- ओमप्रकाश राजेनिंबाळकर
आर्चरी व रायफल शूटिंग क्रीडा साहित्याचा लोकार्पण सोहळा
उस्मानाबाद: जिल्ह्याच्या विकासात क्रीडा क्षेत्राचाही फार मोठा हातभार असून खेळाडूंची कामगिरी उंचावण्याच्या दृष्टीने मैदानासह साहित्यही अतिशय महत्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन आर्चरी व रायफल शूटिंग क्रीडा साहित्य लोकार्पण सोहळा प्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले. उस्मानाबाद येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर आर्चरी व रायफल शूटिंग क्रीडा साहित्य लोकार्पण सोहळा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगर परिषद अध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बालाजी जाधवर, पंचायत सदस्य गजेंद्र जाधव, विजय सस्ते, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, तालुका क्रीडा सारिका काळे, क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, कैलास लटके, जिल्हा आर्चरी संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, प्रशिक्षक अल्लाउद्दीन सय्यद यांच्या सह खेळाडू व पालक यांची प्रमुख उपस्तीथी होती. जिल्ह्यातील खेळाडू राज्य राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाचा ठसा नेहमीच उमटवत आहे. क्रीडा क्षेत्र विकासासह आधुनिकतेच्या दृष्टीने खेळाडू हाच केंद्र बिंदू असून त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून क्रीडा साहित्यासाठी २४ लाख २० हजार रुपयाची आर्थिक तरतूद उपलब्ध करून खेळाडूंना साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याचे व खेलो इंडिया अंतर्गत जिल्ह्यात आर्चरी, खो खो व ऍथलेटिक्स प्रशिक्षण केंद्रांनाही मान्यता मिळण्याच्या दृष्टीकोनातून मी स्वतः केंद्रीय क्रीडा विभागाशी पाठपुरावा केला व तिन्ही प्रशिक्षण केंद्रांना मान्यता मिळाली असून भविष्यात या प्रशिक्षण केंद्रामुळे जिल्ह्यातून उत्कृष्ट ऑलीम्पिकपटू घडण्यास मदत होणार असल्याचे यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले. राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव यावेळी आर्चरी क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय खेळाडू आरोही दीक्षित, आर्यन गरड, अनुष्का मुळे, परीस पाटील आदी खेळाडूंचा गौरव खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

0 Comments