Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना योद्धा पुरस्काराने पत्रकार राम कांबळे सन्मानित

कोरोना योद्धा पुरस्काराने पत्रकार राम कांबळे सन्मानित 


बी डी उबाळे

औसा: येथील पत्रकार राम कांबळे यांना कोरोना योद्धा या पुरस्काराने जागतिक महिलादिनी सन्मानित करण्यात आले. सोमवार दि 8 मार्च 2021रोजी औसा येथे सतत हसतमुख असणारे,ग्रामीण पत्रकारांचा जिव्हाळा जपणारे सर्व पत्रकारांचे जिवलग आणि जेष्ठ मित्र पत्रकार रामभाऊ कांबळे(सर) यांना छाया स्मृती पप्पूभाऊ डांगे सेवाभावी संस्थेच्या वतीने कोरोनाच्या संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हिरीरीने समाजसेवा करणारे आरोग्य कर्मचारी, पोलिस,नगर परिषद कर्मचारी,इतर सामाजिक कार्यकर्ते,व पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन पत्रकार राम कांबळे यांना " कोरोना योद्धा" पुरस्कार देताना रावसाहेब सूर्यवंशी सौ कल्पनाताई डांगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments