सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पालिकेसमोर उपोषण सुरू
बी डी उबाळे
औसा-नगर परिषद कर्मचाऱ्यांचे चार महिन्यापासून वेतन थकले असून थकित असलेले नोव्हेंबर ते 4 फेब्रुवारी या चार महिन्याचे वेतन द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी कामगार संघटनेचे औसा तालुका अध्यक्ष आत्माराम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली औसा नगर परिषदेसमोर दि. 9 मार्च पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांसह पेन्शन वर असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी औसा पालिकेसमोर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून उपोषणात सहभागी झाले. दिवसभर पालिकेसमोर उपोषणास बसलेल्या उपोषणार्थीस मुख्याधिकारी यांनी पहिल्या दिवशी साधी भेटही दिली नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कर्मचारी वयोवृद्ध असल्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादीने त्रस्त असून कार्यरत कर्मचाऱ्यांनीही साखळी उपोषणाला पाठिंबा दिला आहे. या उपोषणात अशोक बनसोडे, लालखाँ पठाण, मन्मथ कुर्ले, गौस पटेल, भीमाशंकर मनगुळे, बाबू इनामदार, सुधाकर पुंड. फुलचंद बनसोडे, काशिनाथ लोंढे, प्रभाकर जोशी, मिनाबाई मिटकरी, लतीफ शेख आदी कर्मचारी सहभागी झाले होते. मागणी मान्य होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.

0 Comments