कोथिंबीरीची सुरु आहे मंदीची लाट,शेतकऱ्याची लागली आर्थिक पाठ; पाच एकर पिकांवर फिरविला नांगर
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील कोथिंबीर उत्पादक शेतक-याने सध्या मंदीची लाट सुरु असल्याने भावच मिळत नाही यामुळे 5 एकर कोथिंबीर पिकांवर नांगर फिरविला आहे. औसा तालुक्यातील उटी बु येथील शेतकरी रामकृष्ण सखाराम जाधव यांनी दि 15 जानेवारी रोजी पाच एकर कोथिंबिरीचा पेरा केला होता त्यावर सोमवार दि 8 मार्च 2021 रोजी नांगर फिरविला आहे. दि सर्व करताना पंजी 3 हजार 500, रोटावेटर 5 हजार,पेरणी 5 हजार, बियाणे 27 हजार 500,खुरपणी 25 हजार,फवारणी 15 हजार असा एकूण खर्च 81हजार रुपये केला असून लाखो रुपयांचे उत्पादनाचे स्वप्न पाहिले होते परंतु सध्या बाजारात कोथिंबिरीला भाव मिळत नसल्याने त्यांनी पाच एकर कोथिंबिरीवर नांगर फिरविला आहे.त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही यामुळे त्यांचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे सांगितले.
कोथिंबिरीला भाव नाही यामुळे माझे पाच एकर मधील पाच लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले असून किमान एक तरी 300 कॅरेट कोथिंबीर माल तयार झाला होता याला बाजार भाव वीस रुपये प्रति किलो मिळाला असता तरी पाच लाख रुपये उत्पन्न झाले असते परंतु बाजार भाव सध्या अगदी पडला आसल्याने माझे नुकसान झाले आहे असे कोथिंबीर उत्पादक शेतकरी तालुक्यांमध्ये अनेक आहेत, याबाबत शासनाने शेतकरी "जगला" पाहिजे असे धोरण राबविणे अपेक्षित आहे.
-रामकृष्ण सखाराम जाधव,रा. उटी( बु ) ता. औसा.

0 Comments