Latest News

6/recent/ticker-posts

मेन लाईन स्थलांतरित नाही केल्यास युवासेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

मेन लाईन स्थलांतरित नाही केल्यास युवासेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील ननंद या गावी  200 kv ट्रांसफार्मर व इलेव्हन केवी मेन लाईन स्थलांतरित नाही केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी दिला. निलंगा तालुक्यातील ननंद या गावी गेली वीस वर्षापासून 200 kv ट्रान्सफर हा भर रस्त्याच्या मधोमध असून त्याला चिटकून घर आहेत, आतापर्यंत एक बैल व दोन म्हशी दगावल्या असून महावितरण कंपनीला वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊन सुद्धा ट्रांसफार्मर हा स्थलांतरित केला गेला नाही स्मशान भूमी मध्ये जागा असून तेथे 200 kv चा ट्रांसफार्मर स्थलांतरित करण्यात यावा,11 kv मेन लाईन पंचवीस घरावरून गेली आहे त्याचा धोका पंचवीस कुटुंबं आहे ती मेन लाईन स्मशानभूमीत स्थलांतरीत  करण्यात यावी, तसेच गावातील 25 kv चे दोन ट्रान्सफॉर्मर स्मशानभूमीत स्थलांतरित करण्यात यावे या मागण्या तात्काळ मान्य नाही केल्यास युवा सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणची राहिली असा इशारा युवा सेना उपजिल्हाप्रमुख  प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी महावितरणला दिला. या निवेदनावर युवा सेना तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, अमोल मिरगाळे, शरद मिरगाळे, बालाजी नारायणपुरे, आप्पा पालापुरे, कुमार लादे,भीमाशंकर फुलारी,अमोल मिरगाळे,जनार्दन होगाडे ,बक्सु चौधरी, इलाही मोमीन, अरुण चौधरी, सिद्धलिंग आप्पास्वामी, नकुल होगाडे, मारुती कांबळे, शंकर मिरगाळे, भीमाशंकर फुलारी, करण बोधले, नन्हू बागवान, मैनुद्दीन बागवान, शिवाजी कदम, नसरुद्दीन मुल्ला, अभय मिरगाळे  इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments