Latest News

6/recent/ticker-posts

चाकुर तालुक्यात निराधारांचे ९४ अर्ज मंजुर;सर्व पेडिंग फाईल मंजुरीसाठी प्रयत्न करणार- करीम गुळवे अध्यक्ष सं.गा.यो.

चाकुर तालुक्यात निराधारांचे ९४ अर्ज मंजुर;सर्व पेडिंग फाईल मंजुरीसाठी प्रयत्न करणार- करीम गुळवे अध्यक्ष सं.गा.यो.


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) मागील अनेक वर्षापासुन निराधारांच्या पगारीसाठी तालुक्यातील अनेक पाञ लाभांर्थी वाट पाहत होते.निराधारांच्या पगारीसाठी मिंटीग कधी होणार यांची उत्सुकता होती.चाकुर तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समितीची बैठक दि.2 मार्च रोजी सकाळी येथील तहसिल कार्यालयात बैठक झाली.यात केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजने अंतर्गत   निराधारांचे अर्ज समितीने मंजुर केले. केंद्र व राज्य सरकाराकडुन समाजातील निराधार व्यक्तीसाठी संजय गांधी निराधार योजना,इंदीरा गांधी वृध्दपकाळ योजना,श्रवणबाळ राज्य योजना,इंदीरा गांधी राष्ट्रीय विधवा,व दिव्यांग विकलांग योजना आदि योजना राबवत प्रती महिना एक हजार रुपये ,लहान एक अपत्य असेल तर अकराशे रुपये,दोन अपत्य असतील तरबाराशे रुपये अनुदान दिले जाते.नुकतीच संजय गांधी निराधार योजनेची तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.यासमितीची बैठक सं.गा.यो.समितीचे अध्यक्ष तथा माजी सभापती प.स.चाकुर करीम गुळवे यांच्या अध्यक्षतेखाली चाकुर तहसिल कार्यलयात संपन्न झाली.यावेळी अनेक दिवसांन पासुन प्रलंबित असलेले प्रस्ताव यासमितीने मंजुर केले.योग्य व पाञ लाभांर्थीची निवड करण्यात आली. यावेळी तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे,नायब तहसिलदार बालाजी चितळे, सदस्य मिंलिद महालिंगे,सोमनाथ स्वामी,निलेश देशमुख,शेख हुसेन[पप्पुभाई], सावंता माळी,पांडुरंग धडे,गणेश सिंधाळकर,लक्ष्मण पेठकर,आदि उपस्थित होते. निराधार समितीची बैठक २५ एप्रील रोजी होणार आहे.गरजु व पाञ लाभार्थानी आपले प्रस्ताव सादर करण्याचे आहवान करीम गुळवे यांनी केले.

गेल्या पाच ते सहा वर्षापासून संगायो समिती गठीत करण्यात आली नव्हती.आ.बाबासाहेब पाटील यांनी नुकतीच संगायो समिती गठित केल्यामुळे चाकुर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना,इंदारा गांधी वृध्पकाळ योजना,श्रवणबाळ राज्य योजना,इंदीरा गांधी विधवा,व दिव्यांग विकलांग योजना यांच्या प्रलंबित प्रस्तावासाठी समिती प्रयत्न करणार आहे.चाकुर तालुक्यात पाञ लाभांर्थी यापुढे या योजनेपासुन वंचित राहणार नाही.येणाऱ्या समितीच्या  बैठकीमध्ये पाञ असणाऱ्या सर्वच प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न करणार आहे- करीम गुळवे अध्यक्ष,संगायो समिती तालुका चाकुर



करीम गुळवे अध्

Post a Comment

0 Comments