Latest News

6/recent/ticker-posts

उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे नवजात जन्मलेल्या बाळांना कपडे व मातांना फळांचे वाटप

उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे नवजात जन्मलेल्या बाळांना कपडे व मातांना फळांचे वाटप 




निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) आज सोमवार दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत जिजाऊ ब्रिगेड महिला शाखा निलंगा च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे नवजात जन्मलेल्या बाळांना ड्रेस व मातांना फळांचे वाटप करून महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिजाऊ ब्रिगेड महिला शाखा निलंगा च्या अध्यक्ष शिवमती अर्चना मोरे , राजश्री शिंदे , श्रीमती सुंदर बोडके, श्रीमती हाडोळे व स्नेहा मुळे आदी जण उपस्थित होते यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.साळुंके , डॉ.माने , डॉ. चव्हाण , डॉ.पाटील व आळंदकर या सर्वांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले जिजाऊ ब्रिगेड महिला शाखा च्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Post a Comment

0 Comments