महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ निलंगा च्या वतीने महिला खेळाडूंचा सत्कार-सन्मान कार्यक्रम संपन्न
निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शाहू महाविद्यालय लातूर च्या वतीने आयोजित केलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये लातूरच्या संघांमध्ये निलंगा येथील महिला खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी करत उपविजेतेपद मिळवले तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले यामुळे आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा निलंगा च्या वतीने या महिला शिक्षक खेळाडूंचा सत्कार करून सन्मान करण्यात आला यामध्ये श्रीमती मंगल दवणे, श्रीमती राजश्री शिंदे, श्रीमती बापुरे संगीता, श्रीमती सारिका दंडीमे, श्रीमती परके संगीता या शिक्षक महिला खेळाडूंचा तर ग्रामसेविका महिला खेळाडू श्रीमती सारिका यांचाही सत्कार करून सन्मान करण्यात आला याप्रसंगी धुमाल डीजे शिवश्री एम एम जाधव सर, किरण धुमाळ, आनंद जाधव, चांबरगे, सूर्यवंशी एसटी, सराटे पीजी, बिरुटे, बाबळसुरे, तसेच महिला शिक्षिका श्रीमती अर्चना मोरे श्रीमती कवठे श्रीमती बोंडगे श्रीमती रेड्डी यांची या महिला दिनाच्या व महिला खेळाडूंच्या सत्कार व सन्मान कार्यक्रमाला उपस्थिती होती.

0 Comments