भादा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसिकरणास सुरूवात
भाद्यातील माजी सरपंच व ह.भ.प. रेवण पाटील यांनी घेतली पहिली लस
भादा:औसा तालुक्यातील भादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज कोरोना प्रतिबंधक लस नागरीकांना देण्यास सुरूवात करण्यात आली. भाद्याचे माजी सरपंच व ह.भ.प. रेवण पाटील हे हि लस घेणारे भाद्यातील पहिले व्यक्ती ठरले. आज ८ मार्च या जागतिक महिला दिनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस नागरीकांना देण्यास सुरूवात झाली. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. रेड्डी , गावचे उपसरपंच बालाजी शिंदे, आरोग्य सहाय्यक हिप्परगेकर, आरोग्य सेविका दुरुगकर मँडम, सुर्यवंशी सर, जोशी मँडम, यांची उपस्थिती होती. हि लस घेण्यासाठी दवाखाण्यात जाताना संबंधीत व्यक्तीना सोबत आपले आधारकार्ड ,किंवा पँनकार्ड , किंवा मतदान ओळखपत्र, सोबत घेवुन जावे लागेल. आज येथील आरोग्य केंद्रात साठ वर्षे वयाच्या व त्यापेक्षा अधिक वय असणा-यांना हि लस देण्यात आली. गावातील नागरीकांनी आपली व परिवाराची काळजी घ्यावी व सुरक्षिततेचे नियम पाळावे व प्राथमीक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या सल्ल्याने हि लस घ्यावी असे आवाहन उपसरपंच बालाजी शिंदे यांनी नागरीकांना केले आहे.

0 Comments