Latest News

6/recent/ticker-posts

नळेगावचा पाणी पुरवठा तात्काळ सुरु करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा

नळेगावचा पाणी पुरवठा तात्काळ सुरु करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा


नळेगाव:( प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे ) दि. 8 -  चाकूर तालुक्यातील नळेगाव हे सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असून जवळपास 25 हजाराहून अधिक गावची लोकसंख्या आहे. या गावात लातूर शिवपूर नऊ खेडी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जात होता. या योजनेवरून सुरु असलेला पाणी पुरवठा महाराष्ट्र विद्धुत मंडळाने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या 15 दिवसापासून पाणी बंद असल्यामुळे नळेगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सुनील शिंगे यांना सूर्यकांत चव्हाण, श्याम मुंजाने, दगडू सावळकर यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकावे लागत आहे. तसेच गावातील असंख्य बोअर(कूपनलिका) व हातपंप बंद आहेत. जनावरांच्या बाजारातील सोलर पंप हे सुद्धा बंद आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना, ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तरी सर्व कूपनलिका, हातपंप व बैल बाजारातील सोलर पंप त्वरित 17 मार्च 2021 पर्यंत विधुत पुरवठा सुरळीत करून पाणी पुरवठाचालू करावा अन्यथा नळेगाव ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनामार्फत देण्यात आला.

Post a Comment

0 Comments