औशाला लाभार्थी येण्याची गरज नाही- विस्तार अधिकारी बालाजी तेलंग
नरेंगाच्या समस्या आणि समाधान बैठकीतील माहिती
लातूर(जिल्हा प्रतिनिधी/बी डी उबाळे) नरेगाच्या कोणत्याही कामासाठी गावातील लाभार्थी औशाला येण्याची आवश्यकता नाही त्याचे सर्व काम ग्रामरोजगार सेवक आणि ग्रामसेवक यांनी पाहणे अपेक्षित असल्याचे मत विस्तार अधिकारी बालाजी तेलंग यांनी आयोजित बैठकीत व्यक्त केले. शुक्रवार दि 26 मार्च 2021 रोजी पंचायत समिती औसा येथे ग्राम रोजगार सेवक, तांत्रिक अधिकारी,वरिष्ठ सहाय्यक राजू शृंगारे,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी साहेबराव सोनकांबळे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये अनेक गावांमध्ये ग्रामरोजगर सेवक नियुक्ती रखडली असल्याने ते नियुक्त करणे,प्रत्येक गावातील ग्राम पंचायतला ग्रामरोजगर सेवकासाठी फर्निचर पुरवठा करणे,दप्तर नमुने 1 ते 7 नमुने परिपूर्ण,दि 27 मे 2012 च्या शासकीय आदेशाप्रमाणे ग्रामरोजगार सेवक यांची जवाबदारी निश्चित केलेली आहे त्या प्रमाणे काम जवाबदारीने करणे ,समन्वयाने लाभार्थी आणि कार्यालायीन कर्मचारी लाभार्थी यांच्यामध्ये समन्वयाने काम करा,यावेळी सहाय्यक लार्यक्रम अधिकारी ,विस्तार अधिकारी, बी डी ओ,इंस्टीमेट हेच औसा पॅटर्न म्हणून सर्व जिल्ह्यात राबत आहे,नारेगामध्ये केवळ ग्रामरोजगर सेवक आणि ग्राम सेवक आला पाहिजे लाभार्थी येऊ नये,कोणताही कार्यालयीन कागदपत्र खाजगी लोकांच्या हाती देऊ नये,अद्यावत जॉबकार्ड यादी तयार ठेवली पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी विस्तार अधिकारी बालाजी तेलंग,वरिष्ठ सहाय्यक राजू शृंगारे,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी साहेबराव सोनकांबळे,तांत्रीक अधिकारी,डाटा एंट्री ऑपरेटर,घरकुल संजय देडे,ग्रामरोजगर सेवक,उपस्थित होते.तर अनेक ग्रामरोजगर सेवकांच्या समस्येचे समाधान करण्यात आले. तर शेवटी आभार व्यक्त करताना, मजुरांना काम देणे आणि मत्ता निर्माण करणे आदी बाबत चर्चा झाली तर शेवटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी साहेबराव सोनकांबळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.

0 Comments