तळणी (मोहगांव) येथे एकतर्फी प्रेमातून बौध्द तरुणीची आत्महत्या
पीडीत कूटूंबीयांची भेट घेवून केले सांत्वन
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी डी उबाळे) लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मौजे तळणी(मोहगांव) येथे एकतर्फी प्रेमातून नूकतीच कु.समिक्षा गायकवाड (वय 17) या मुलीने गावातीलच ईश्वर बाबू कन्हेरे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची गंभीर घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवार दि 26 मार्च 2021 रोजी डॉ. सिद्धार्थ सुर्यवंशी यांनी प्रत्यक्ष तळणी(मोहगांव) येथे जावून पीडित कूटूंबीयांची भेट घेवून सांत्वन केले असून सदर प्रकरणातील आरोपींना पोलीसांनी अटक केली असल्याची माहिती डॉ. सूर्यवंशी यांच्याकडून प्राप्त झाली आहे. मात्र पोलिसांनी पुढील तपास अधिक गतीने करून मयत मूलींच्या कूटूंबीयांना खरा न्याय द्यावा अशी लोकभावना तयार झाली असल्याचे डॉ. सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच पीडीत कूटूंबाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सदर कूटूंबीयांना आर्थिक मदतीसाठी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण लातूर यांच्याशी फोन वर चर्चा केली आहे. या प्रसंगी डॉ सूर्यवंशी यांच्या सोबत जेष्ठ विधिज्ञ अँड.विजयकुमार सोनकांबळे,दिलीप भालेराव,सचिन कांबळे आदींची उपस्थिती होती.

0 Comments