'चांगभलं'च्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रा सोनाली गुळबीले
लातूर(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे) औसा येथील सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या आणि उच्चशिक्षित अशा धाडसी तरुणी प्रा. सोनाली बाबुराव गुळबीले यांना विविध समाजातील महिलांना एकत्रित करून त्यांना स्वावलंबी सन्मानाने जीवन जगण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून सतत प्रामाणिक प्रयत्नातून प्रोत्साहन दिले आहे. "चांगभलं" सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षांपासून कार्य सुरू असून गत वर्षी कोरोणाच्या जागतिक संकट काळात त्यांनी औसा बसस्थानकामध्ये मानुसकीची भिंत उभारून गरजूंना हवे असलेले कपडे देण्याचे कार्य चांगभलं नारी चेतना संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी केले आहे. "चांगभलं" नारी चेतना बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी एल ई डी माळा बनविण्याचा प्रकल्प उभारून त्यांनी महिलांचा विकास साधण्याचा सतत प्रयत्न असतो. तर समाजामध्ये महिलांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात सतत आवाज उठवितात. औसा पोलीस ठाण्यात स्वयंसिद्धा महिला मंडळ अंतर्गत कुटुंब सल्ला केंद्राच्या स्थानिक संचालिका म्हणून पती-पत्नीचे वाद मिटवून त्यांचा नव्याने संसार जोडण्यासाठी प्रा सोनाली गुळबीले यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. प्रत्येक महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे व भविष्यात संस्कारित मुले देशात घडावीत म्हणून त्यांचा प्रामाणिक आग्रह असतो. मकर संक्रांती निमित्त हळदीकुंकू, आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन या माध्यमातून आयोजन या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमामाता आंबेडकर, झाशीची राणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. आनंदीबाई जोशी यांचा आदर्श घेऊन महिलांनी काम करावे म्हणून सतत त्या झटत असतात. स्वतः शिक्षिका असल्याने संस्कारित विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांचे अविरत कार्य समाजसेवेच्या माध्यमातून औसा तालुक्यात सुरूच आहे. महिलांनी सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यासाठी स्वतः होऊन पुढे आले पाहिजे असे प्रा सोनाली गुळबीले यांनी 'इशारा'प्रतिनिधींशी बोलताना आपले मत व्यक्त केले.

0 Comments