Latest News

6/recent/ticker-posts

पिरुपटेलवाडीत जिल्हा परिषद शाळेत भरते ग्रामपंचायत

पिरुपटेलवाडीत जिल्हा परिषद शाळेत भरते ग्रामपंचायत


कासार बालकुंदा:(प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील डोंगराच्या कुशीत वसलेल्या पिरूपटेल वाडी या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीची इमारत नसल्याने ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका खोलीत भरवत आहेत. पंधराशे लोकसंख्या असणारे पिरूपटेलवाडी गाव असून अनेक समस्या या गावांमध्ये आहेत. ग्रामपंचायत म्हणजे गावचा मंदिर. बसण्यासाठी ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत नसल्याने गावाच्या बाहेर असणाऱ्या डोंगरातील एका खोलीत ग्रामपंचायत भरावी लागत असणे लोकांना ग्रामपंचायतीकडे येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीचे नवीन इमारत बांधण्यात आलेले नाही. जुन्या भिंतीच्या खोलीत पूर्वी ग्रामपंचायत होती मात्र ती पूर्णता ढासळलेली असल्याने बसण्यासाठी जागा नाही. ग्रामपंचायत जुनी पाडून नवीन ग्रामपंचायत इमारत बांधून देण्यात यावी अशी मागणी समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. गावामध्ये ग्रामपंचायत इमारत निर्माण झाल्यास लहान वृद्ध म्हाताऱ्या माणसांना ग्रामपंचायत येथील कामे करण्यास मदत होणार आहे. आत्ता शाळेत भरत असलेली ग्रामपंचायत दूर अंतरावर असल्याने लाईटची सोय नाही, कडेने डोंगराची झाडे व साप फिरत असतात त्यामुळे सुरक्षित जागी गावांमध्ये नवीन ग्रामपंचायतीची निर्मिती झाल्यास गावच्या विकासाची कामे करण्यास मदत होईल.

गावांमधील जुनी ग्रामपंचायतीचे खोली पडलेली आहे त्याच ठिकाणी नवीन इमारत संबंधित प्रशासनाने बांधून देण्यात यावी. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील गावाला ग्रामपंचायत इमारत बांधून दिली जात नाही- सरपंच  नसरुद्दीन पटेल

 शाळेतील इमारतीत ग्रामपंचायत भरवत असल्याने गावातील म्हाताऱ्या माणसांना येण्यासाठी त्रास होत आहे- उपसरपंच राजेंद्र गायकवाड

गावामध्ये जुन्या ग्रामपंचायतीच्या जागेवर ते नवीन ग्रामपंचायत इमारत बांधून दिल्यास गावासाठी अभिमानाची गोष्ट होणार आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी- नागरिक शौकत पटेल

Post a Comment

0 Comments