Latest News

6/recent/ticker-posts

आंबुलगा येथील तीस वर्षाचे जुने चिंचेचे झाड तोडले; शासनाच्या वनीकरणाच्या आदेशाचा पडला विसर

आंबुलगा येथील तीस वर्षाचे जुने चिंचेचे झाड तोडले; शासनाच्या वनीकरणाच्या आदेशाचा पडला विसर


केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु.) येथे शासकीय जागेतील तीस वर्षाचे जुने चिंचेचे झाड सरपंच व उपसरपंच यांनी मनमानी कारभार करून वनीकरण आला किंवा शासकीय कोणतीही परवानगी न घेता वृक्षतोड केली असून याची चौकशी व्हावी यासाठी ग्रामस्थांनी सामाजिक वनीकरण निलंगा यांना अर्ज देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून अर्जावर ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत. मौजे अंबुलगा (बु.) येथे शासकीय जागेमध्ये 30 वर्षापूर्वीचे चिंचेचे फळझाड होते हे फळझाड येथील उपसरपंच वामन साधुराम कांबळे यांनी मनमानी कारभार करून वृक्षतोड करून विकून टाकले आहे. याबद्दल सामाजिक वनीकरण विभाग निलंगा यांना फळ झाड तोडणीचा परवा नाही घेतला नाही तरी गावातील सामाजिक कार्यकर्ते आशिष पाटील यांनी उपसरपंच वामन कांबळे यांना शासकीय जागेतील फळ झाड का तोडत आहात अशी विचारणा केली असता उपसरपंच आणि आशिष पाटील यांना शिवीगाळ केली त्यासंबंधी आवर आज पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. व गावातील सामाजिक कार्यकर्ते जगदीश नगर सदानंद बिराजदार यांनी विनापरवाना शासकीय जागेतील फळ झाड तोडल्या प्रकरणी सामाजिक वनीकरण विभाग निलंगा व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे शासकीय जागेतील फळझाड विनापरवाना तोडल्याबद्दल तक्रार अर्ज केला आहे. महाराष्ट्र शासन वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपये खर्च करून वृक्ष लावून त्याला जागवण्याचे काम करत आहे मात्र ग्रामस्तरावर याची कत्तल केली तर याची संगोपन कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे संबंधित सरपंच आणि शासकीय जागेतील चीनचे फळझाड तोडल्याबद्दल त्यांची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments