Latest News

6/recent/ticker-posts

तालुक्यातील गरीब निराधारांला शासनाच्या योजने पासुन वंचित राहु देणार नाही- करीम गुळवे,अध्यक्ष संगायो

तालुक्यातील गरीब निराधारांला शासनाच्या योजने पासुन वंचित राहु देणार नाही- करीम गुळवे,अध्यक्ष संगायो

चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) गेल्या पाच वर्षापासुन चाकुर तालुक्यात सजंय गांधी निराधार कमिटी अस्तित्वात नसल्यामुळे तालुक्यातील दिव्यांग,विधवा,निराधार, अशा पाञ व्यक्तीवर अन्याय झाला होता. नुकतीच तालुक्यात सजंय गांधी निराधार कमिटीची नियुक्ती अहमदपुर-चाकुर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केली. कमिटीची नियुक्ती झाल्यानंतर नुतन अध्यक्ष करीम गुळवे यांनी पहिल्या बैठकीत जवळपास 94 प्रकरणे निकाली काढुन तालुक्यात निराधारांना आधार देण्याचे काम केले. प्रलंबित फाईली निकाली काढण्यासाठी महिन्यात दुसरी बैठक त्याच्या अध्यक्षतेखाली झाली. चाकुर तालुक्यातील प्राञ असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती पर्यंत ही योजना राबविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.निराधार व दिव्यांग व्यक्तीना न्याय देण्याचा त्याचा मानस आहे.आपल्या मागील अनुभवावरुन तालुक्यातील प्रत्येक पाञ व्यक्तीला योजनेचा लाभ देण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. आपली फाईल दाखल करताना पाञ व्यक्तीनी आपले मेडीकल,उत्पन्न,रहिवाशी,गिरधावर पंचनामा,यासाठी कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करावा. असे आहवान त्यांनी तालुक्यातील निराधार लोकांना केले आहे.खरोखरच पाञ व्यक्तीवर यापुढे अन्याय होणार नाही.शासनाची योजना वंचित घटका पर्यंत पोहचली पाहिजे असे ते म्हणाले.दुसऱ्या बैठकीमध्ये 152 फाईल मंजुर करण्यात आले. यावेळी बैठकीला तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे,बी.डी.ओ.लोखंडे साहेब,नायब तहसिलदार बालाजी चितळे,संगायो सदस्य मिलिंद महालिंगे,पप्पुभाई शेख,सोमनाथ स्वामी,निलेश देशमुख,सावंत माळी,पांडुरंग  धडे,गणेश सिंधाळकर,लक्ष्मण पेठकर,आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments