राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाच्या निलंगा तालुका कार्याध्यक्षपदी कुशाबा कांबळे यांची निवड

निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) निटुर तालुका निलंगा येथील कुशाबा अमृतराव कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल निलंगा तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कैलास प्रकाशराव पाटील यांनी केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी वेळोवेळी पक्ष आदेशानुसार काम कराल तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा प्रचार व प्रसारासाठी आपणास संधी प्राप्त झाली त्याचे आपण सोने करावे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाचा प्रसार व प्रचार करावा, जनसामान्यांच्या अडचणीतील मार्ग काढणारी व्यक्ती म्हणून आपली जनसामान्यात ओळख व्हावी या रास्ता अपेक्षेने आपली निलंगा तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. असे पत्रात नमूद केले आहे. या निवडी बद्दल कुशाबा कांबळे यांचे जहांगीर फकीर, अलीम गस्ते, अफरोज शेख, बुद्धभूषण हारणे, मधुकर गायकवाड, ज्ञानदेव पवार, नानासाहेब पाटील, अजय डोईजोडे, मुजीब सौदागर, सतीश साळुंखे आदी ने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments