लातूर जिल्ह्यात आज कोरोना रुग्णसंखेने शतक ओलांडले
लातूर:(प्रतिनिधी) दि. ५ - लातूर जिल्ह्यात १०८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहिर केले. लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५६८९ वर पोहचली आहे. लातूर जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ७३६ आहे. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला असून लातूर जिल्ह्यात आजपर्यंत ७१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या २४२४१ आहे. ४६ रुग्ण आज बरे झाले आहेत.

0 Comments