प्राथमिक आरोग्य केंद्र निटूर येथे सोमवारपासून कोविड लसीकरण केंद्र सुरु
निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) प्राथमिक आरोग्य केंद्र निटूर येथे दि.08/03/2021 पासून कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात येत आहे. हा लसीकरनाचा तिसरा टप्पा आहे ज्या मध्ये 60 वर्ष व अधिक वयाच्या व्यक्तींना केंद्र शासनाने निश्चित केलेले इतर दुर्धर 20 आजारांपैकी एक असलेल्यांना किंवा कुठलेही दुर्धर आजार नसलेल्यांना लस मोफत दिली जाणार आहे अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र निटूर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. मोरे यांनी दिली. तसेच 45 वर्ष पूर्ण ते 59 वर्ष पूर्ण झालेले व्यक्तींना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दुर्धर आजारी पैंकीना लस मोफत दिली जाणार आहे. ग्रामीण भागात असलेले प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार पासून कोविड लसीकरण केंद सुरु करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा सुरु होणार आहे. आठवड्यात तीन दिवस म्हणजे दर सोमवार, बुधवार, शुक्रवार रोजी लस दिली जाईल. लसीकरण सत्र वेळ असेल सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत. पहिल्या आठवड्यात प्रति सत्र 100 लाभार्थीचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील काळात ते 200 प्रति दिन होईल. तसेच सर्व आरोग्य उपकेंद्र येथे साधारणता या महिना अखेर कोविड लसीकरण केंद्र सुरु होणे अपेक्षित आहे. निलंगा तालुक्यात एकूण सात प्राथमिक आरोग्य केंद्र व एक उपजिल्हा रुग्णालय असे एकूण आठ कोविड लसीकरण केंद्र सुरु राहतील. लसीकरण साठी नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी दोन प्रकारे करता येते. एक म्हणजे लाभार्थी किंवा नातेवाईक यांच्या फोन मध्ये असलेल्या आरोग्य सेतू या अँप मधून व त्यात माहिती भरून. दुसरे लसीकरण केंद्रात येऊन आवश्यक ओळख पत्र जसे की आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, ड्रायविंग लायसन इत्यादी सोबत ठेवून नोंदणी करता येईल. लस घेतल्या नंतर लसीकरण केंद्रात किमान अर्धा तास देखरेखी खाली राहावे लागेल. लस घेण्यासाठी येण्या अगोदर जेवण व काही औषधी असतील तर सेवन करून येणे आवश्यक आहे. सोबत एक नातेवाईक आले तरी चालेल. लसीकरण सेवेचे पाच कक्ष आहेत.
1) प्रतीक्षा कक्ष. 2) नोंदणी कक्ष. 3) पडताळणी कक्ष. 4) लसीकरण कक्ष. 5) निगराणी कक्ष.
इतर सूचना.
1) लसीकरण केंद्रात व कुठल्याही कक्षात अनावश्यक गर्दी करू नये. 2) प्रथम टोकन असलेल्या लाभार्थी यांना प्रथम सेवा दिली जाईल. 3) दिवसभरात केवळ 100 लाभार्थी साठी लस दिली जाईल म्हणजे 50 ऑनलाईन केलेले व 50 स्पॉट नोंदणी.
4) सर्व आरोग्य विषयक अटी व प्रमाणपत्रे पूर्तता होत असलेल्या व्यक्तींनाच लस दिली जाईल.
5) लसीकरण केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे.
6) लसीकरण झाल्यावर अंदाजे दोन ते चार तासानंतर ते एक दिवसा पर्यंत किरकोळ स्वरूपात काही लक्षणे दिसून किंवा अनुभवास येऊ शकतात जसे की डोकं दुखणं, साधे ताप येणे, चक्कर थोडया वेळा करिता, अंग दुखणं इत्यादी सारखे. ह्या तात्पुरते लक्षणे असतील. किरकोळ औषध उपचार केल्यास हे नाहीसे होईल. असे काही वाटल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यात सेवा घ्यावी.
7) लसीची पहिली मात्रा घेतल्या नंतर दुसऱ्या मात्रेची अपेक्षित तारीख लाभार्थी यांच्या फोन नंबर वर संदेश रुपी प्राप्त होईल. तरी लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचारी या बाबत माहिती देतील. 28 दिवसांनी दुसरी मात्रा घेता येईल. सर्व सखोल माहिती शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्ष पूर्ण ते 59 वर्ष पूर्ण झालेले व्यक्तींना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दुर्धर आजारी पैंकीनी लसीकरण नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ. एस. बी.मोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

0 Comments