कोकळगाव,मुदगड एकोजी च्या रस्त्या वर गिट्टीचे साम्राज्य
मदनसुरी:((प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील कोकळगाव ते मुदगड एकोजी या रस्ताला निजामकालीन रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने हा रस्ता अनाथ झालेला आहे का ? असा प्रश्न स्थानिकांना द्वारे व्यक्त केला जातो आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,सरवडी जि.प.अंतर्गत कोकळगाव ते मुदगड एकोजी हा रस्ता तीन ते साडे तीन किलोमीटर चा रस्ता आहे. कोकळगाव, मुदगड एकोजी, सरवडी आदी गावाचे व्यावहारिक संबंध असल्याने व कोकळगाव येथे डी.सी.जी.बँकेे, असल्याने सरवडी मुदगड एकोजी, कवठा आदी गावातील आर्थिक व्यवहार व इतर कामासाठी येणे जाणे मोठ्या प्रमाणात आहे.शिवाय कामलेवाडी कोकळगाव येथील विद्यार्थी माध्यमिक शाळेला मुदगड एकोजीला जात असतात त्यापैकी कांही विद्यार्थी चालत तर कांही सायकलवर तर कांही दुचाकीवरून जात असतात मात्र रस्त्यांनी जात असताना त्यांना मोठी कसरत करावी लागते आहे.रस्त्या रस्त्यावर विपुल प्रमाणात खड्डे, गिट्टीचे साम्राज्य पसरल्याने पायी चालताही व्यवस्थित येत नाही अशी अवस्था झाली असूनही, संबंधित जि.प. बांधकाम विभाग व सरवडी जि.प अंतर्गत निवडून आलेले सदस्य याना या रस्त्याचा विसर का पडतोय हा प्रश्न निर्माण होतो आहे. रस्त्यावरून जात असताना वाहनांच्या पाठीमागे धुराळा मोठ्या प्रमाणात उडत असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येशी तोंड द्यावे लागते आहे.जि.प.अध्यक्षांनी ग्रामीण भागातील रस्त्यांची तात्काळ दखल घेऊन मंजूर करून ताबडतोब रस्त्याचे काम चालू करावे अन्यथा सरवडी मुदगड एकोजी कोकळगाव आदी गावच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

0 Comments