झरी जिल्हा परिषद शाळेमध्ये आज स्वयंशासन दिन साजरा
केळगाव: प्रतिनिधी/वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील झरी जिल्हा परिषद शाळेमध्ये आज आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन साजरा करून एक दिवस शाळेत अध्यापनाचे कार्य केले. मुख्याध्यापक म्हणून आठवी वर्गाची विद्यार्थिनी अंकिता गणेश बिराजदार व उपमुख्याध्यापक म्हणून कुमारी शेख माहिया यांनी आज स्वयंशासन दिनाचे कामकाज पाहिला आजच्या सर्व शिक्षक शिक्षिका यांनी उत्कृष्ट अध्यापन कार्य केले दिवसभर शाळेत अध्यापन करू नये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्याला ठेवले होते. शेवटी शाळेतील दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली त्यामध्ये शेख माहीया बिराजदार रोहित यांची निवड करून त्यांना भेट म्हणून रजिस्टर देण्यात आले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गजानन पाटील उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामस्थ पालक महिला युवक युवती यांनी भेट दिली तसेच विष्णुकांत धुमाळ शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष यांनी भेट देऊन बाला उपक्रमाविषयी गौरवोद्गार काढले सर्व शिक्षक शिक्षिका यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परिश्रम घेतले आठवीच्या विद्यार्थ्यांनी आज अध्यापन कार्य केल्याबद्दल विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले सर्वांचे आभार शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

0 Comments