Latest News

6/recent/ticker-posts

भादा जिल्हा परिषद प्रशाला,आनंदनगर या शाळेने घेतला मोकळा श्वास

भादा जिल्हा परिषद प्रशाला,आनंदनगर या शाळेने घेतला मोकळा श्वास 


बी डी उबाळे

औसा:आनंद नगर जिल्हा परिषद प्रशाला भादा तालुका औसा येथील जिल्हा परिषद शाळेने गेल्या अनेक वर्षापासून येथे शाळेच्या पश्चिम बाजूने खूप मोठी काटेरी झाडी आली होती या झाडीमुळे ही शाळा अगदी कुंपण मय आणि दाटीवाटी निर्माण झाली होती ते गुरुवार दिनांक 11 मार्च 2021 रोजी ग्रामपंचायत कडून या शाळेचे संरक्षण भिंतीसाठी परीसर जागा स्वच्छ करण्यात आली, यावेळी गेल्या अनेक वर्षापासून शाळेच्या श्वास कोंडलेली शाळा तिने मोकळा श्वास घेतला. यामुळे विद्यार्थी शिक्षक त्यांचे आरोग्य आणि स्वच्छ वातावरण निर्माण झाल्यामुळे परिसरही स्वच्छ दिसत असून मुलांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत मिळणार आहे.यामुळे शिक्षण प्रेमींनी या शाळेच्या कामाबाबत ग्रामपंचायतचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments