Latest News

6/recent/ticker-posts

केळगाव गाव मध्ये आठ दिवसापासून विजेचा लपंडाव

केळगाव गाव मध्ये आठ दिवसापासून विजेचा लपंडाव


केळगाव:( प्रतिनिधी वसीम मुजावर ) निलंगा तालुक्यातील केळगाव येथील मागील आठ दिवसांपासून विद्युत महावितरण कंपनीचा विद्युत पुरवठा नेहमी खंडित होत असल्याने गावकरी व शेतकऱ्यांना चांगले अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतातील पिकासाठी पाण्याची आवश्यकता आहे तर गावांमध्ये घरातील फॅन पंखी हे यापासून बचाव करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत परंतु याला लागणारी वीज नेहमी खंडित होत असल्याने गावकऱ्यांना चांगलीच अडचण निर्माण झाली आहे दररोज सायंकाळी एक ते दीड तास विद्युत पुरवठा बंद होत आहे परिणामी फॅन बंद असल्याने नागरिकांना उकाडा व गरमीचा त्रास सहन करावा लागत आहे. या आठवड्यात मागच्या रविवारी सलग अठरा तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यांनीही चांगलीच अडचण झाली आहे तर दररोज खडीत होणारा सायंकाळचा विद्युत पुरवठा नेहमीच सुरू करा व गावातील इंद्रानगर व जुन्या गावातील भागातील विद्युत पुरवठा रात्रीच्यावेळी नियमित खंडित होत असल्याने हा पुरवठा नियमित पूर्ववत करावा अशी मागणी Adv. पद्माकर पेठकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments