Latest News

6/recent/ticker-posts

बापरे... एकाच विहीरीत तीन साप;कामगाराचा उडाला थरकाप

बापरे... एकाच विहीरीत तीन साप;कामगाराचा उडाला थरकाप


लातूर:(प्रतिनिधी) एकाच विहिरीत भलेमोठे तीन साप टाकळी शिवारातील शेतकरी संजय जाधव यांच्या शेतामध्ये नवीन विहीरीचे काम सुरू आहे. सकाळी विहीर खोदकाम मजुर कामाला सुरुवात करत असताना एक साप पाण्यात पडलेला दिसला थोड्याच वेळात विहिरीच्या बाजूला इतर दोन साप एकमेकांना वेटोळे घालून खेळत होते तेही विहिरीत पडले. विहीर खोदकाम मजुरांनी तात्काळ शेतमालक संजय जाधव यांना बोलावून घेतले त्यांच्यासोबतच असलेले गोविंद सुरवसे यांनी लातूर येथील ज्येष्ठ सर्पमित्र नेताजी जाधव यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ सर्पमित्र सिद्धार्थ चव्हाण, वाजिद शेख यांना संपूर्ण साप पकडण्याच्या सामुग्री सह साप पकडण्यासाठी पाचारण केले सध्या उन्हाळ्याची सुरुवात असल्यामुळे शेतकरी बोरवेल्स आणि विहीर खोदकामाचे काम करत आहेत. सदरची विहीर 70 फूट खोल असल्यामुळे क्रेनच्या सहाय्याने विहिरीमध्ये उतरून सर्पमिञ सिद्धार्थ चव्हाण व वाजिद शेख यांनी त्या तबल आठ फूट लांबीच्या धामण जातीच्या सापाला मोठ्या शिताफतीने पकडून पंचनामा करण्यात आला. पकडलेले साप निसर्गाच्या सान्निध्यात पुनर्वसित करण्यात आले. सध्या सापांचा विणीचा हंगाम आहे. पकडलेले तिन्ही साप नर जातीचे असून पूर्ण वाढ झालेले आहेत हे साप त्या परिसरात असलेल्या मादी सापाच्या मिलनासाठी एकत्रित आले होते पण निसर्गाच्या नियमाप्रमाणे अशा नर जातीच्या सापांमध्ये स्पर्धा होते आणि त्यातून जो विजयी ठरतो तो मिलनासाठी पात्र होतो अशी माहिती ज्येष्ठ सर्पमित्र नेताजी जाधव यांनी दिली अशा प्रकारचे साप आपल्या परिसरात आढळून आल्यास तात्काळ वन विभागाच्या अधिकृत सर्प मित्रांशी संपर्क साधावा असे अवाहन करण्यात आले.



Post a Comment

0 Comments