निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणास सुरवात
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) कोरोना लसीकरणाची दुसऱ्या टप्प्यातील मोहीम 1 मार्चपासून सुरू झाली असून उपजिल्हा रुग्णालय निलंगा येते 60 वर्षावरील नागरिकांना मोफत लसीकरणाची सुरुवात झाली आहे. निलंगा उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या टप्प्यात 1652 कर्मचाऱ्यांची लसीकरण यशस्वी करण्यात आले. दि. 1 मार्चपासून 60 वर्षावरील सर्व नागरिकांना व 45 ते 59 वयोगटातील 25 आजारांपैकी कोणताही एक आजार असणाऱ्या नागरिकांना मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. लसीकरणासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी केल्यानंतर लगेच लसीकरणासाठी तारीख आपणास मोबाईलवर कळणार आहे त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे लसीकरणासाठी येताना आधार कार्ड मतदान कार्ड व 45 ते 59 वयोगटातील नागरिकांना आजार असलेले डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण मोहिमेसाठी उपजिल्हा रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप सौंदळे सर , वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रल्हाद सोळुंके , डॉ.दिनकर पाटील , डॉ.दीपक हुग्गे , श्रीमती भाग्यश्री काळे आदींसह सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
कोविड लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.
https://selfregistration.sit.co-vin.in/

0 Comments