भादेकर भुमीपुत्र मंडळ कृषी अधिकारी विकास लटुरे यांचा जिल्हा कृषी अधिक्षक यांच्या हस्ते सत्कार
बी डी उबाळे
औसा: भादेकर भूमीपुत्र मंडळ कृषी अधिकारी बेलकुंड विकास लटुरे यांचा लातूर जिल्हा कृषी अधिक्षक यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. औसा तालुक्यातील बोरफळ येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या सर्व अधिकारी यांच्या प्रक्षेत्र भेटी दरम्यान 'मंडल कृषी अधिकारी बेलकुंड' या यूट्यूब चैनल वर कृषि विस्ताराचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने आणि मंडळातील काही प्रातिनिधिक शेतकरी यांच्या हस्ते विकास लटूरे यांचा सत्कार करण्यात आला. अल्पावधीतच YouTube channel ने दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. यावेळी परिसरातील सर्व शेतकरी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी,जिल्ह्यातील कृषि विभागाचे सर्व अधिकारी, मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि सर्व सहकारी उपस्थित होते. विविध गावांमधील पदाधिकारी ही हजर होते. आशिवचे सरपंच गोविंद मदने,औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव माने व काळमाथा येथील पोलीस पाटील हरिभाऊ पाटील यांचे विशेष करून या कार्यक्रमास उपस्थित होते. या सत्कार प्रसंगी सर्व सहकारी बांधवांच्या सहकार्यामुळे आणि सर्व मित्र परिवार ,आप्तेष्ट ,नातेवाईक आणि कुटुंबीय यांच्या प्रेरणेमुळेच आणि पाठबळामुळेच हे शक्य झाले. आपणा सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. असे भावनिक होऊन यावेळी विकास लातुरे यांनी आपली भावना व्यक्त केली.

0 Comments