Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथील ऑइल गळतीमुळे रोहित्र जळाले शेतक-याची दुरुस्तीची मागणी

भादा येथील ऑइल गळतीमुळे रोहित्र जळाले शेतक-याची दुरुस्तीची मागणी  


लातूर:( जिल्हा प्रतिनिधी/बी डी उबाळे ) औसा तालुक्यातील भादा येथील शिंदेवाडी रोड वर असणारे रोहित्र दुपारी चार वाजता गळतीमुळे आग लागून जळाल्याने  रोहित्राचे मोठे नुकसान झाले आहे. भादा शिवारातील 11न रोहित्र तेल गळतिने रोहित्र जळाले आहे. यामुळे या भागातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. सदरील हे रोहित्र हे रविवार दि 21 मार्च 2021 रोजी दुपारी 4 वा जळण्यास सुरुवात होताच यावेळी रोहित्राजवल हजर असलेले शेतकरी हणमंत निवृत्ती शिंदे, दयानंद शिंदे यांनी सुरुवातीला तेल गलत असताना वीज वितरण कंपनी कर्मचारी यांना दुरध्वनी केला असता सदरील कर्मचाऱ्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता ते शिवारातील विद्युत प्रवाह तारा जोडणी करीत असल्याचे सांगितले आणि ते काम होताच परत फोन करून चौकशी केली असता डीपी जळाल्याचे निदर्शनास आल्याचे वीज वितरण कर्मचाऱ्यांनी सांगितले आणि हातावरील काम होताच तात्काळ डीपी कडे धाव घेतली आणि त्याची पाहणी केली असता ते रोहित्र गरम असल्याने उद्या त्याची पूर्ण पाहणी करून दुरुस्तीबाबत कलाविले जाईल असे सांगितले. तर सदरील रोहित्र लवकर बसवून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे अशी मागणी भादा येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments