पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मदनसुरीत 51 जणांचे रक्तदान
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी )निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जिवनदाता महाअभियाना अंतर्गत मदनसुरी येथे युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 51 जणांनी रक्तदान करीत शिबिरात सहभाग घेतला. या शिबिराचे उद्घाटन युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर टोंपे यांच्या हस्ते झाले. यावेळी अभयसिंह पौळ ,वेदरत्न माने, संजय सुर्यवंशी , सुभाष माने,विशाल जाधव, पुनीत पाटील, विजय पाटील , आनंद जाधव , बबलू पाटील, मनोज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरासाठी गणेश विहीरे, गणेश माने,अक्षय माने,बाशीद शेख, अविनाश शिंदे प्रशांत निंगाले यांनी विशेष परिश्रम घेतले.शिबीरासाठी लातूर ब्लड बँकने सहकार्य केले.

0 Comments