Latest News

6/recent/ticker-posts

डॉ. सुरेश कुलकर्णी यांचे दुःखद निधन

डॉ. सुरेश कुलकर्णी यांचे दुःखद निधन



चाकुर:(ता.प्र.)चापोली येथील डॉ. सुरेश विनायकराव कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने सोलापूर येथे निधन झाले. डॉ. सुरेश कुलकर्णी हे एमबीबीएस ही पदवी प्राप्त करणारे पाहिले चापोली चे सुपुत्र होत. त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून मुरूम, सांगली, जव्हार, पुसद येथे काम केले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून यवतमाळ येथून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी, सून, नातवंडे, तीन भाऊ, एक बहिण असा मोठा परिवार आहे. रविवारी त्यांच्या पार्थिव देहावर सोलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने चापोली ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments