Latest News

6/recent/ticker-posts

शीख समाजाचा तर्कशास्त्री हरवला! स. हरमहेन्द्रसिंघ सर यांचे दुःखद निधन

शीख समाजाचा तर्कशास्त्री हरवला! स. हरमहेन्द्रसिंघ सर यांचे दुःखद निधन


नांदेड: (प्रतिनिधी) प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे माजी उप-प्राचार्य आणि शीख समाजातील बुद्धिवंत व्यक्तिमत्व स. हरमहेन्द्रसिंघ सर (74) यांच्या निधनाची बातमी मनाला स्तब्ध करणारी ठरली. त्यांच्या अनेक आठवणी चलचित्राप्रमाणे सतत मष्तिष्कात भ्रमण करीत आहेत. प्रतिभा निकेतन महाविद्यालयात विद्यार्थीदशेत असतांना नेहमीच त्यांच्या जवळ राहून  सामाजिक आणि धार्मिक विषयांवर त्यांचे मत जाणून घेण्याची वेळोवेळी संधी लाभली. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा रस असायचा. समाजात सुरु झालेल्या अनेक उपक्रमात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांना आम्ही तर्कशास्त्री मनायचो. प्रत्येक विषयावर भाष्य करण्यास ते सक्षम असायचे. स्वाध्याय परिवारावर त्यांचे अपार प्रेम होते. सरांच्या मार्गदर्शनातून असंख्य विद्यार्थी घडले गेले आणि अनेकजण चांगल्या पदावर आज कार्यरत आहेत. मोठ्या जड अन्तःकरणाने दिवंगत हरमहेन्द्रसिंघ सर यांना आदरांजलि वाहत आहे. शीख समाज एका अष्टपैलू व्यक्तिमत्वास मुकला आहे. स. रविंदर सिंग मोदी तर्फे व "मराठी अस्मितेचा इशारा" तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments