हैदरभाई पांढरे यांचे दुःखद निधन
केळगाव:(प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील केळगाव येथील हैदर महामुद पांढरे वय 55 वर्ष यांचे अल्पशा आजाराने आज सोमवारी वेळ दुपारी 2:30 वाजता दुःखद निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजीवउँन त्यांच्यावर आज केळगाव येथील कबरस्तान मध्ये रात्री आठ वाजता दफनविधी करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. त्यांना लाडाने सर्वजण हैदरभाई (डॉन) असे म्हणत होते. गोर गरीब लोकांसाठी मदतीला अडचणीला धावून जाणारे असे हैदर (डॉन) यांचा स्वभाव होता. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण केळगाव नगरीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

0 Comments