Latest News

6/recent/ticker-posts

औसा शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर धडक कार्यवाही

औसा शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर धडक कार्यवाही


दंडात्मक कार्यवाही मुळे प्रवासी वैतागले

शेख बी जी 

औसा: दि.२९ - औसा शहरात पोलिसांनी सणासुदीच्या दिवशी विना मास्क फिरणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कार्यवाही केली. काहीजणांनी दंड दिला तर काही जणांनी पोलिसांना खरी खोटी सुनावली. आज दिनांक २९  धुलउडी सण असल्याने प्रवाशांची रेलचेल जास्त होती. अचानक चार वाजल्यापासून औसा शहरातील हाश्मी चौकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. ज्यामध्ये पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्या प्रवाशांकडून दंडात्मक कार्यवाही करत मोठ्या प्रमाणात वसुली केल्याचे दिसून आले. चार चाकी वाहनांमधून जाणाऱ्या काही महिला प्रवाशांनी पोलिसांना म्हणाले की" तुमचा या जबरदस्ती मुळेच हा आजार जात नाही." तर एका दुसऱ्या प्रवाशाने म्हटले की आमच्या घरावरील पत्रे विकून तुम्हाला वसुली देतो. "पोलिसांनी आज ज्या पद्धतीची तत्परता दाखवली त्या पद्धतीची तत्परता शहरात होणाऱ्या चोर्‍यांच्यासंदर्भात दाखवली असती तर शहरात चोरी घडून आली नसती." असे अनेक जण मुख्य चौकात चर्चा करत असताना दिसून आले. काहीही झाले तरी शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर कार्यवाही झाल्याने मास्क घालून फिरणार्‍यांची संख्या वाढेल व काही प्रमाणात आजाराला आळा बसेल.

Post a Comment

0 Comments