भिम आर्मीची नूतन लातुर जिल्हा व तालुका पदाधिकारी कार्यकारणी जाहीर
लातुर:(जिल्हा प्रतिनिधी:बी डी उबाळे) दि. २८ मार्च २०२१ रोजी लातुर येथील बुद्ध गार्डन येथे झालेल्या भिम आर्मी भारत एकता मिशन च्या कृती आराखड्याच्या बैठकीचे स्वरूप व विचार विनिमय करण्यात आले असून सर्वं प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार हार घालून बैठकीला सुरुवात करण्यात आली. यामध्ये नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीत संघटनेने घालून दिलेल्या २१ कलमी कार्यक्रमाचे मराठवाड्याच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी वाचन करून दाखवण्यात आले व मार्गदर्शन करून लातूर जिल्हा व लातूर शहरातील काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या वेळी मराठवाडा उपाध्यक्ष विनोद कोल्हे मराठवाडा संघटक मिलिंद ढगे जिल्हा प्रमुख विलास चक्रे ,जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे ,जिल्हा संघटक सुभाष बनसोडे,जिल्हा सचिव बबलू शिंदे,शिवा लांडगे ,लातूर शहर अध्यक्ष बाबा ढगे ,शहर महासचिव बबलू गवळे, औसा तालुका प्रमुख समाधान कांबळे ,निलंगा नितीन कांबळे,देवणी तालुका प्रमुख पुष्पक सूर्यवंशी ,आदी उपस्थित होते, भिम आर्मीच्या वरिष्ठ पदाधिकारी व जिल्हा प्रमुख यांचे हस्ते भीमदर्शन बोरे लातूर जिल्हा सह संघटक दीपक सूर्यवंशी देवणी तालुका सल्लागार अफसर शेख अहमदपूर तालुका प्रमुख सोहेल चाऊस अहमदपूर तालुका उपाध्यक्ष पदी तर बाबासाहेब जोगदंड चाकूर तालुका प्रमुख प्रवीण वलांडे लातूर शहर उपाध्यक्ष अभिषेक वाघमारे लातूर तालुका संघटक उत्कर्ष भूतकर लातूर शहर संघटक पदी वरील पदाधिकाऱ्यांना निवडीचे नियुक्तीपत्र व पुष्पहार घालून त्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या, या वेळी निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आलेल्या सर्व पदाधिकारी यांनी आपापले मत मांडत असतांना संघटनेने आमच्यावर दिलेली जबाबदारी समजून संगटनेला कसल्याही प्रकारचे गालबोट लागू देणार नाही व समाजातील गोरगरीब, महिला याना शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असे सर्व नवीन पदाधिकारी यांनी आपले राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रस्पष्ट मत मांडले.

0 Comments