अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली शेतकऱ्याच्या ज्वारीची बनिम;लाख रुपयाची ज्वारी जळून खाक
केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) दि.२९ - निलंगा तालुक्यातील केळगाव येथे आज संध्याकाळी नऊ वाजता अज्ञात व्यक्तीने ज्वारीच्या बनीमेस आग लावून देणारी घटना घडली या घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. केळगाव येथील राठोडा रोडवरील हंबीर बाबा यांच्या टेकडीच्या बाजूला असलेल्या धोंडीराम बाबू काळे यांची अडीच एक कर क्षेत्रावरील रब्बीची बडी ज्वारी हे रास करण्यासाठी कंसाची बहिण लावण्यात आली होती परंतु आज संध्याकाळी नऊ वाजता शेतामध्ये ठेवलेला बनविण्यास अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने अंदाजे 30 कट्टे ज्वारी होणारी बनिम जळून खाक झाली आहे. वर्षभर काबाडकष्ट करून शेतकरी शेतामध्ये राबराब राबतो व आपल्या शेतातील पिकांना आपल्या लहान मुलाप्रमाणे वाढवतो परंतु काही वाईट वृत्तीच्या लोकांमुळे गरीब व सामान्य शेतकऱ्याला आर्थिक फटका बसत आहे. घटनास्थळाचा त्या शेतकर्याच्या परिवाराचा आक्रोश मन हेलावणारा होता. वर्षभर कष्ट करून पिकवलेली ज्वारी हे डोळ्यासमोर जळून गेल्याने आता लेकरा बाळाला व घर प्रपंचाला खायचे काय असा प्रश्न समोर निर्माण झाला आहे प्रशासनाने माझी अडचण लक्षात घेता मला आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी धोंडीराम बाबू काळे यांनी केली आहे.

0 Comments