भादा-औसा रोडवर 'मौत का खड्डा' वाहन चालकांची दुरुस्तीची मागणी
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे) औसा-भादा रस्त्यावर प्रवास करीत असताना रस्त्यामध्ये मध्यभागी एक मोठा खड्डा निर्माण झाला असून यामुळे आपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. औसा भादा प्रवास करत असताना या तेरा किमी प्रवासामध्ये रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांची दैनंदिन परेशानी वाढली असून हलदुर्ग येथील छोट्या नदीवरील पुलाचा भराव वाहून गेल्याने रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला असून मोठे वाहन वगळता लहान चार चाकी वाहनासही हा खड्डा आपघात घडवू शकतो असा हा मोठा खड्डा धोकादायक ठरणार आहे. कारण हा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी असल्याने समोरचे वाहन बाजूने जाताना त्या वाहनास बाजू देताना कोणत्याही प्रकारचे वाहन असो त्याला अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या ठिकाणी अपुरा असा अरुंद रस्ता असून वळण रस्ता आहे,झाडे रस्त्यावर आले आहेत यामुळे समोरून येणारे वाहन चालवताना दिसत नाही तर याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी आपघात होऊन मृत्यू झाल्याच्या दोन वेग वेगळ्या घटना घडलेल्या आहेत याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. या रस्त्यावरून दिवसाकाठी बस,ट्रक,ट्रॅक्टर,मोटर सायकल सह शेतीला जाणारे पशु (गाय, म्हैस)आदी पशुधन, बैल गाडी,खाजगी गाड्या आदींसह हजारो वाहनांची रेलचेल दैनंदिन औसा-मुरुड मार्गावर सुरु असते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय हळदुर्ग- बऱ्हाणपूर यांनीही याबाबत प्रशासन दरबारी अडचण निदर्शनास आणून दिली पाहिजे अशी मागणी या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारक आणि चालक याच्याकडून केली जात आहे.

0 Comments