Latest News

6/recent/ticker-posts

ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या माजी उपनगराध्यक्षा ला 'खाकी'चा झटका

ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या माजी उपनगराध्यक्षा ला 'खाकी'चा झटका



शिरूरअनंतपाळ:(प्रतिनिधी) कोरोना मुक्त झालेल्या लातुर जिल्हा व ग्रामीण भागात ही नव्याने कोरोना संर्सग रोगाने डोक वर काढले आहे. त्यामुळे आपल्याला काहीही धोका नाही, अशा भ्रमात फिरणाऱ्याची संख्या दिवसोदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शिरूरअनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शना खालील सुरू असलेल्या कारवाईत पोलीस नाईक दत्तात्रय तुमकुटे यांनी दि. 29 मार्च 2021 रोजी राञी पावणे आठ वाजता आनंदवाडी पाटी रोडवर शिरूर अनंतपाळ नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष संतोष संभाजी शेटे हे मो.सा.क्रमांक एम एच 24 ए 3375 हे दारू पिऊन दारूच्या नशेत वेडीवाकडी चालवत असताना आढळले. स्वताच्या व इतराच्या जीवीतास धोका होईल असे गाडी चालविणार्‍या माजी उपनगराध्यक्ष संतोष शेटे यांच्या तोंडाचा उग्र वास येत असल्याने त्यांची ब्रेथ अँनालायझर्सच्या मशीनने तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्याकडे मोटरसायकल चालवायचा परवाना ही नव्हता त्यामुळे मोटर वाहन कायद्याखाली त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय तुमकुटे हे करत आहेत.पोलीसांनी मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या नागरिकांवर केलेल्या कारवाईचे जनतेतून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments