Latest News

6/recent/ticker-posts

तिरट जुगारावर छापा; शिरूर अनंतपाळ पोलीसांची दमदार कामगिरी

तिरट जुगारावर छापा; शिरूर अनंतपाळ पोलीसांची दमदार कामगिरी


शिरूर अनंतपाळ: पैशावर जुगार खेळणा-या विरूध्द शिरूर अनंतपाळ पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई दि 29मार्च 2021 रोजी रविवारी दुपारी 1 वाजता मौजे ताजपुर शिवारात करण्यात आली असून, यावेळी रोख रक्कम, जुगाराच्या साहित्यासह 3400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मौजे ताजपुर शिवारात पैशावर जुगार सुरू असल्याची माहिती शिरूर अनंतपाळ पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मल्लया स्वामी यांच्या पथकाने कारवाई केली आहे. आरोपी गुरुनाथ बिराजदार, महारुद्र चिद्रे, विठ्ठल सूर्यवंशी, माधव पडुळकर हे मौजे ताजपुर येथील सिद्धेश्वर पाटील यांच्या घराचे पाठीमागील गावठाण मधील असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यांच्याकडून तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळण्यासाठी लागणारे पत्ते, जुगाराचे साहित्य व रोख 3400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपीना महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. सदरील कारवाई मुळे तालुक्यातील जुगार खेळणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. पुढील तपास बिट अंमलदार कांबळे करत आहेत

Post a Comment

0 Comments