निलंगा शहरातील बंद असलेले पथ दिवे लवकरात लवकर चालू करा- मुजीब सौदागर
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) शहरातील बंद असलेले पथदिवे चालु करणे बाबत व अंधाराचा फायदा घेवून वाढत्या होत असलेल्या चोऱ्या थांबवण्यासाठी योग्य ती उपाय योजनात्वरीत करणे बाबत उपविभागीय अधिकारी यांना शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान संघटनेतर्फे निवेदन देऊन मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की आपणास संघटने मार्फत निवेदन देण्यात येते की , निलंगा शहरातील संपुर्ण पथदिवे गेल्या 15 दिवसांपासून बंद आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरीकांस त्रास होत असून चोऱ्यांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहेत अंधाराचा फायदा घेवून चक्क हातून मोबाईल ओढून घेवून गेल्याच्या सहा ते सात घटना घडल्या आहेत. भविष्यात मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर पालिकेतील सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रति आरोप करुन मोकळे होत आहेत. परंतु विना कारण त्रास सर्व सामान्य नागरीकांस होत आहे. सत्ताधारी व विरोधी सत्येत अथवा विरोधात येतात - जातात, पण आपणाकडे शासन म्हणुन जबाबदारी पुर्वक न्यायाच्या आशेने आम्ही निवेदन देवून योग्य उपाय योजना करुन आम्हा सर्व निलंगेकरास न्याय दयावा अशी मागणी केली आहे निवडणुका आल्या की पावसाळी छत्र्या सारखे नेते बाहेर येतात पण सध्या गेल्या पंधरा दिवसापासून संपूर्ण शहर अंधारात असून सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे अशा संकटाच्या वेळी वाली कोण असा संतप्त सवाल जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर यांनी केला आहे. लवकरात लवकर वरील मागण्या मान्य नाही झाल्यास सर्व बंधने झुगारुन नाविलाज तिव्र अंदोलन छेडण्यात येईल व त्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहिल याची नोंद घ्यावी असा उल्लेख सदरील निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर, तालुका अध्यक्ष सब्दर कादरी, वसीम सय्यद, मुजीब खुरेशी, सितारी वहाब, शेख हुसेन, मणियार वाजीद, सितारी रहीम, खदिर चौधरी आदींच्या जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 Comments