मनसेचा चाकूर नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांकडून रस्ते,पाणी व गटारींचा "स्पॉट पंचनामा"
दूषित पाणी व निकृष्ट रस्ते,तुंबलेल्या गटारी याला जिम्मेदार कोण? मनसे जिल्हाध्यक्ष डॉ.भिकाणे यांचा मुख्याधिकाऱ्यांना सवाल
चाकुर:( ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकूर नगर पंचायत मधील शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा पाईपलाईन "वॉलव्ह"मधून दूषित पाणी जनतेच्या घरांमध्ये जात आहे तसेच मोठ्याप्रमाणात पेव्हरब्लॉक रस्त्यांचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे.या दोन्ही बाबींचा निषेध नोंदवत जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांना जाब विचारत मनसेने तीव्र "हल्ला बोल"आंदोलन करत मुख्याधिकाऱ्यांना "स्पॉट पंचनामा"कार्यवाही करण्यास भाग पाडले.शहरातील पेट्रोल पंप जवळ पाईपलाईन मधून फवारे उडतात व तिथेच गटाराचे व तुंबलेले पाणी दिवसभर साचलेले असते त्याचा मख्याधिकाऱ्यांकडून सर्वप्रथम स्पॉट पंचनामा करत ते ताबडतोब दुरुस्त करा अशी मागणी मनसेने मुख्याधिकाऱ्यांकडे केली कारण यामुळे जनतेला दूषित पाणी भेटत आहे व आजारांना तोंड द्यावे लागत आहे.तद्नंतर पेव्हारब्लॉक रस्त्याच्या निकृष्ट कामाचाही स्पॉटपंचनामा मुख्याधिकाऱ्यांना करायला लावला त्याठिकाणी पेव्हारब्लॉक निकळलेल्या अवस्थेत होते व त्याखाली पाणी साचले होते.यातील संबंधित दोषी घटकांवर कार्यवाही करा असे वरिष्ठांनी आदेश देऊनही मुख्याधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली आहे.तरी त्या वर कार्यवाही करा व रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याविषयी आदेश काढा असेही मनसेने सुनावले.तसेच पिण्याच्या पाण्याची टाकी,तुंबलेल्या गटारी यांचाही मनसेने मुख्याधिकारी यांच्याकडून स्पॉट पंचनामा केला.जिथे अनेक महिन्यांपासून गटारी साफ न केल्याची व गतारातील अळ्या घरात येत असल्याची कैफियत स्थानिकांनी मांडली.शेवटी मुख्याधिकाऱ्यांसोबत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य टाकीवर जाऊन तेथील अस्वछतेचा स्पॉट पंचनामा करण्यात आला.त्यानंतर या सर्व बाबींचे निराकरण होईल व लेखी कार्यवाही होईल अश्या मुख्याधिकाऱ्यांच्या हमी नंतर मनसेने हे हल्लाबोल आंदोलन थांबवले. दर्जेदार रस्ते,निर्जंतुक पाणी व गटारांची स्वच्छता हा नागरिकांचा हक्क आहे व ते यासाठी नगरपंचायतीचे कर भरतात परंतु त्यांना जर निकृष्ट रस्ते,तुंबलेल्या गटारी व दूषित पाणी भेटत असेल तर नगरपंचायत आहे कश्यासाठी?यावर मुख्याधिकारी कार्यवाही का करत नाहीत म्हणून आज हा स्पॉटपंचनाम केला असे जिल्हाध्यक्ष डॉ भिकाणे यांनी सांगितले. म्हणून मनसेने प्रशासनाला जागे करण्यासाठी व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हे हल्ला बोल आंदोलन केले आहे असेही ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष अजय धनेश्वर, कृषितालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,माझी तालुकाध्यक्ष अजित घनटेवाड ऍड ओंकार शेट्टी,रमहिला तालुकाध्यक्ष नवरखेले सरस्वती,राम कसबे,दत्ता सूर्यवंशी, तुळशीदास माने,विठ्ठल प्रसाद झाम्बरे,गणेश चौहान,कृष्णा गिरी,सुरज लोंढे आदी उपस्थित होते.

0 Comments