शेतकरी संघटनांच्या देशव्यापी "भारत बंद" ला भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी तालुका चाकुरचा पाठिंबा चा पाठिंबा
डॉ.शिवानंद बिडवे,तहसिलदार चाकुर यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी व शेती उद्धवस्त होणार आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधत आहे. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. या महागाईने सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहेच परंतु नोकरदार व मध्यमवर्गीयांचेही कंबरडे मोडले आहे. देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली असताना मोदी सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंदची हाक दिली असून या भारत बंदला काँग्रेस पक्ष सक्रीय पाठिंबा देत आज राज्यभर उपोषण करण्यात येत आहेत.या बंद मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी तालुका चाकुरच्या वतीने सामील होऊन पाठिंबा देण्यात आला. तरी केंद्र सरकारने हे शेतकरी विरोधी तिनही काळे कायदे तात्काळ रद्द करावेत आणि देशात होत असलेली महागाई कमी करावी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनावर रामराव बुदरे,विलासराव पाटील,शिवकुमार पाटील, भागवत फुले,गंगाधर केराळे,शेख पप्पुभाई,शमीम कोतवाल,अ.ना.शिंदे, शिंदे,सलीमभाई तांबोळी,सुरेश मुंडे,देशमुख सिराजभाई, गायकवाड सुदर्शन,मोठेराव सिताराम,विश्वनाथ पाटील, रामचंद्र तिरुके,रणजीत पाटील,मुबारक शेख,भुंजग अर्जुने,धनजय कोरे,शेषेराव कोरे,बालाजी सुर्यवंशी,दिगबर स्वामी,शंकरे विश्वनाथ,शेख युसुफभाई,अनिल महालिंगे, बस्वराज इरवाने,प्रकाश पटणे,सदाशिव मोरे,सुनिल शिंदे,शिवाजी जाधव,लहुजी कोरे,सुनिल दांडगे,सचिन चाकुरकर,विजय धनेश्वर,केशव शिरुरे,अझहर सौदागर,सिध्देश्वर एकलिंगे,स्वाक्षरी आहेत.यावेळी चाकुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली चाकुर बिट अंमलदार बाळु आरदवाड,जोशी यांनी चोक पोलीस बंदोबस्त लावला होता.

0 Comments