शेतकऱ्यांना जशी आर्थिक मदत होते.त्यांच धर्तीवर मजुरांना आर्थिक मदत करा
माजी नगराध्यक्ष मिलींद महालिंगेचे तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी
चाकूर:(तालुका प्रतिनिधी/सलीमभाई तांबोळी) कोरोनाच्या काळात मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती.अनेक मजुरांना स्थलांतर करावे लागले. मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे मजुरांवर अक्षरशः सध्या उपसमारीची वेळ आली आहे, शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे शासन आर्थिक मदत करत आहे त्याचप्रमाणे मजुरांनाही केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांनी आज चाकुरचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याचबरोबर शासनाने मजुरांचे कर्ज माफ करावे, त्याचबरोबर लाईट बिलेही माफ करावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच त्यांनी या मागण्यांसाठी शासनाच्या विरोधात निदर्शने केली. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना जशी शासनांने अनुदान देऊन मदत केली होती. त्या धर्तीवर मजुरांनाही आर्थिक मदत करावी. लॉकडाऊनच्या काळात छोटे उद्योग,कामगार,व्यापारी,शेतमजुर,याना बेरोजगार झाले आहेत.जगण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात अनुदान शासनातर्फे देण्यात यावे. मजुरांना नोटीशी आल्यामुळे ते भयभीत होऊन शेतकऱ्याप्रमाणे आत्महत्या करण्याच्या मनस्थित आहेत. शेतकऱ्यांना शासनातर्फे कर्ज माफ करुन आर्थिक मदत करीत आहे. त्याप्रमाणे शेतात काम करणाऱ्या शेतमजुराला इतर कामगारांना शासनातर्फे आर्थिक मदत (मानधन) मिळावे. या निवेदनावर माजी नगराध्यक्ष मिलींद महालिंगे, पपन कांबळे, लक्ष्मण तिकटे, नितीन डांगे, विक्की महालिंगे, द्यानोबा महालिंगे, चेतन महालिंगे, दयानंद वाघमारे, शेख अब्बास आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 Comments