सेवानिवृत्त नगर परिषद कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनासाठी उपोषणाचा इशारा
औसा:(तालुका प्रतिनिधी/बी डी उबाळे) औसा नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असल्याने पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार सुरू आहे. सेवानिवृत्त कर्मचारी साठ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्याने प्रत्येकांना मधुमेह उच्च,रक्तदाब इत्यादी व्याधी असल्याने आर्थिक अडचणी येतात त्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर ते फेब्रुवारी अशा चार महिन्याचे थकीत वेतन देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी कामगार संघटनेचे अध्यक्ष आत्माराम हरिबा बनसोडे यांनी मुख्याधिकारी औसा यांना निवेदनाद्वारे केली आहे.मार्च पर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चार महिन्याचे थकीत वेतन नाही दिल्या सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करतील असा इशारा संघटनेच्या वतीने निवेदनातून दिला आहे उपोषण काळात पुन्हा सही नाही झाले तर मुख्याधिकारी रोखपाल जबाबदार राहतील असे निवेदनात नमूद केले आहे.

0 Comments